Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी
    जळगाव

    भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी

    By June 10, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमदारांसह संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची निवेदनाद्वारे केली मागणी…

    पाचोरा (प्रतिनिधी) :  भडगाव येथे दि. ६ जून सोमवार रोजी आमदारांच्या नैतृत्वाखाली शिवसेनेकडून भडगाव येथील महावितरण कार्यालयावर ताला – ठोको व हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनाच्या आधी आमदारांनी  कार्यकर्त्यांना उत्साहित व संतप्त अशी चिथावणीखोर वक्तव्य केले. परिणामतः भडगाव येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांचेसह कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीत वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला असा गंभीर आरोप यावेळी पाचोरा  भाजपाचे अमोल शिंदे यांनी केला.

    तसेच अशा पद्धतीने महावितरण कार्यालयात जबरी प्रवेश करून अभियंता व वायरमन यांना बेकायदा मारहाण करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजविघातक प्रकृतीचा शोध घेऊन आमदारांसह संशयितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत कर्मचारी गजानन राणे यांच्या कुटुंबाला शासनस्तरावरून तात्काळ ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे अशी मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहोत असे अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले. तसेच मागील सात आठ दिवसांपासून पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महावितरण कंपनीच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करीत होते. आणि अल्पमतात निवडून आलेल्या आमदारांनी पक्षात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून चैतन्य निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून महावितरण विरोधात पत्रकार परिषदा घेतल्या होत्या व बातम्या छापून आणल्या होत्या मागील आठवडाभरात आमदारांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य,चिथावणी देणारे विधाने

    त्यातही प्रामुख्याने आमदार म्हणाले होते की, महावितरण अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच कार्यालयात खुर्चीवर देखील बसू देणार नाही व त्यांच्या आंदोलनामुळे समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे. आमदार यांच्या सहेतुक भडक वक्तव्यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांना स्फुरण चढले आणि त्यामुळे संबंधित संशयितांनी हे कृत्य केले. आणि ही दुर्दैवी घटना घडली गजानन राणे यांच्या दुर्दैवी मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता विद्यमान आमदार यांचेसह मारहाण करणाऱ्या संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन यावेळी भाजपचे अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, भुषण देवरे, संजय पाटील, दिपक माने आदी पदाधिरकार्यांनी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif