भडगाव :- शहरातील जलाली मोहल्ला येथील रहिवासी व भडगांव नगरपालिकेच्या नगरसेविका जाकेराबी इब्राहीम मलिक (वय ८८) यांचे बुधवारी दुपारी २.३0 वाजता भडगाव येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
पश्चात मुलगा, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या समाज सेवक इसाक मलीक यांची आई होत. त्यांची अंत्ययात्रा आज बुधवारी रात्री १० वाजता राहत्या घरापासून (जलाली मोहल्ला) येथून निघणार आहे.