Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भडगाव येथे आय.टी.आय जवळ बस व टेम्पोचा अपघात, १९ प्रवाशी जखमी
    गुन्हे वार्ता

    भडगाव येथे आय.टी.आय जवळ बस व टेम्पोचा अपघात, १९ प्रवाशी जखमी

    Tushar BhambareBy Tushar BhambareAugust 8, 2021No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगांव  | प्रतिनिधी

    येथे तितुर नदि अलीकडे भडगांव पाचोरा वळणावर बस व टेम्पो मध्ये भिषण अपघात सुदैवाने जिवीत हानी झाली नसून मात्र १९ प्रवासीं जखमी झाले आहेत. त्यांना ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. त्यांचेवर उपचार करण्यात आले. ही घटना दि. ७ रोजी दुपारी घडली. विठ्ठलवाडी – मलकापुर बस क्रमांक एम.एच.१४ बी.टी.२७६९ पाचोरा कडे जातांना वळणावर पाचोराहून चाळीसगांव कडे जाणारा टेम्पो क्रमांक एम.एच.१९ सी.वाय.२५०२  या वाहनास भरधाव येणार्या बस ने गाडी ओव्हरटेक करत असतांना धडक  दिली.अपघात ईतका भिषण आहे की टेम्पो मधील किराणा माल व तेलाची टाकी फुटून रस्त्यावर तेल सांडले गेले. किराणाने भरलेली टेम्पो कजगांव येथिल गुरूद्त किराणा यांची असून टेम्पोतिल ड्रायव्हरसुद्धा थोडक्यात बचावले परंतू बस मधील बसलेले १९  प्रवासी जखमी झाले आहेत.

    घटनास्थळी जखमी झालेले प्रवासी  यात १) सुनिता गुलाबराव पाटील. वय २८ वर्ष. रा.महादेवगल्ली भडगाव. २) जय गुलाब पाटील. वय  ९ वर्ष .रा.महादेव गल्ली  भडगाव ,३) गुलाबराव पाटील. वय ३२ वर्ष. रा.महादेव गल्ली ४) दिपक रोहीदास पाटील . वय ३२ वर्ष. रा.लोणपिराचे ,५) काव्या गुलाबराव पाटील. वय ३ वर्ष. रा.महादेव गल्ली ,६) संजय पंडीत चौधरी. वय ५२ वर्ष. रा.सातगांव, ७) शुभांगी विलास पाटील. वय १८ वर्ष. रा.लोहारी, ८) विकास मुकूंदा वराडे. वय ४७ वर्ष. रा.जामनेर, ९) निर्मलाबाई शिवाजी पाटील. वय ४५ वर्ष. रा.वाडी शेवाळे, १०) रमेश चिंतामण पाटील. वय ५९ वर्ष.रा.सामनेर ,११) लिलाबाई भास्कर पाटील. वय ६२ वर्ष. रा.लोहारी ,१२) मोनिका भारत राऊत. वय ३५ वर्ष. रा.पिंपळगाव हरेश्वर ,१३) राज विकास वराडे. वय ११ वर्ष. रा.जामनेर, १४) लताबाई पाटील. वय  ७१ वर्ष.रा. जामनेर .१५) सुनिता वराडे. वय ५० वर्ष.जामनेर . १६)  रुषद भरतराव राऊत. वय ३ वर्ष. रा. पिंपळगाव हरेश्वर. १७) राज विकास वराडे. वय. ११ वर्ष. रा. जामनेर. १८) भारत सुभाष राऊळ. वय ३८ वर्ष. रा. पिंपळगाव हरेश्वर. १९) भाग्यश्री भारत राऊळ. वय ३५ वर्ष. रा. पिंपळगाव हरेश्वर. अशी जखमींचे नावे असुन ही घटना कळताच भडगांव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी पंचनामा करण्यासाठी पोलीसांसह घटनास्थळी दाखल झाले .काही प्रवाशांचे दात पडलेले आहेत. तर काही प्रवाशांना डोक्याला मार लागला आहे. एका प्रवाशाचा पाय फ्रक्चर झाला आहे. या जखमी प्रवाशाला समर्पण हाऊसस्पीटलला उपचारासाठी दाखल केले आहे. ५ जखमी प्रवाशांना जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आलेले आहे. इतर जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयातुन घरी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती रुग्णालयाच्या सुञांनी दिली. या घटनेमुळे नुकसान झालेल्या टेम्पो व किराणा माल यांची भरपाई व जखमी झालेल्या प्रवाश्यांनाही भरपाई मिळावी अशी प्रवाशांची व टेम्पोधारकाची मागणी आहे.सायंकाळी उशीरापर्यंत पोलीसात नोंद करण्याचे काम सुरु होते.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026

    यावलमध्ये ११ महिलांवर मारहाण करून दागिने हिसकावल्याचा आरोप!

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif