भडगांव (प्रतिनिधी) : भडगांव पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक धनंजय महादेव येरुळे यांचा ३ वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांची बदली जळगांव पोलिस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्या आदेशाने बोदवङ पोलीस ठाण्यात रिक्त पदी करण्यात आली आहे.
तर त्यांच्या जागी ठाणे शहर पोलीस स्टेशन येथुन बदलुन आलेले पोलिस निरीक्षक अशोक रावजी उतेकर यांची भडगाव पोलिस ठाण्यात रिक्त जागी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी भङगाव येथे नुकताच पदाचा चार्ज घेतला आहे. यापुर्वी त्यांनी जामनेर, कासोदा, फैजपुर, पहुर येथे सेवा बजावली आहे. त्यांची नोकरी एकुण २८ वर्ष झाली आहे. त्यांचे मुळ गाव ठाणे हे आहे.