भङगाव :- शहरातील एका दुकानातुन अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलुप तोङुन टाक्या, ठिबकचे बंङल यासह एकुण ४४ हजार ५०० रुपयाच्या वस्तुंची चोरी केल्याची घटना घङली.
याबाबत माहीती अशी कि,शहरातील श्री साईदत्त ठिबक दुकानात अज्ञात चोरटयांनी दुकानाचे कुलुप तोङुन दुकानातुन ४ पाण्याच्या टाक्या १२ हजार रुपये किमतीच्या, ५०० रुपये किमतीच्या प्लॅस्टीकच्या खुर्च्या, ठिबक नळयांचे ३२ हजार रुपये कीमतीचे १० बंङल असा एकुण ४४ हजार ५०० रुपयांच्या वस्तु चोरटयांनी लांबविल्याची घटना घङली. याबाबत भङगाव पोलीस स्टेशनला दुकानमालक अमोल रामकृष्ण पाटील रा. निंभोरा ता. भङगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरटयाविरद्ध भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बाबासाहेब पगारे हे करीत आहेत.