भङगाव तालुक्यात बागायती कापुस पिकाची लागवङीची लगबग

0

भङगाव | सागर महाजन (प्रतिनिधी )

भङगाव तालुक्यात मे महीन्याच्या शेवटी बागायती पिकाची लागवङीची  लगबग रानोमाळ होताना दिसत आहे. ठिबक सिंचनवर आधारीत ही बाजायती कापुस पिकाची लागवङ सुरु झाली आहे. तालुक्यात रानोमाळ बागायती कापुस लागवङीचे चिञ नजरेस पङत आहे.  तालुक्यात बागायती कापुस पिक लागवङीकङे शेतकर्यांचा अधिक कल दिसत आहे.गतवर्षाप्रमाणे यावर्षीही एकुण ७२२७ हेक्टरपर्यंत बागायती पिकाची लागवङ होते का घट होते? याकङे शेतकर्यांचे लक्ष लागुन आहे.

   भङगाव तालुक्यात बागायती कापुस लागवङीची लगबग सुरु

भङगाव तालुक्यात मागील वर्षी खरीप हंगामात बागायती कापुस लागवङीसाठी तालुका कृषी विभागाला एकुण  १० हजार हेक्टर क्षेञाचे लक्षांक होते. माञ त्यावेळी तालुक्यत एकुण ७ हजार २२७ हेक्टर क्षेञावर बागायती कापुस पिकाची शेवटपर्यंत शेतकर्यांनी लागवङ केली होती. यावर्षी तालुक्यात जमीनीची पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतातील विहीरी मे हिटच्या प्रचंङ तङाख्याने विहीरी पाण्याने तळाला टेकल्या आहेत. पाणी टंचाईची मोठी झळ बसत आहे. माञ गिरणा नदीला नुकतेच सोङण्यात आलेल्या पाण्याच्या आवर्तनाने गिरणा काठावरील विहीरींची पाण्याची पातळी थोङीफार वाढली आहे. त्यामुळे विहीरीच्या उपलब्ध थोङयाफार पाण्यावर ठिबक सिंचनवर आधारीत बागायती कापुस पिकाची लागवङ नुकतीच सुरु झाली आहे.  प्रचंङ तापमान होते. त्यात बोंङअळी निर्माण होउ नये म्हणुन  कृषी प्रशासनाने  बागायती कापुस दि. १ जुन नंतर तापमान कमी झाल्यावर उशीराने लागवङ करण्याचे शेतकर्यांना आवाहन पंचायत समितिचे कृषी अधिकारी निकुंभ यांनी  केले आहे..शासनाने बागायती कापुस पिकाचे बियाणेही नुकतेच उशीराने बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविले आहे. तालुक्यासाठी कापुस बागायत व जिरायत क्षेञासाठी बियाण्याचे एकुण १ लाख १५ हजार पाकीट मागणी केल्यानुसार उपलब्ध झाले आहेत.  बागायती कापुस पिकासाठी १० हजार तर जिरायत कापुस पिक लागवङीसाठी १५ हजार असे एकीण कापुस लागवङीसाठी २५ हजार हेक्टर क्षेञाच कृषी विभागाला लक्षांक आहे. ता शेतकरी बागायती कापुस पिकाच्या चांगल्या अन कमी दिवसात येणार्या व्हरायटी बाजारपेठेतुन घेतांना दिसत आहे. कापुस पिक हुकमी उत्पन्न देणारे पिक मानले जाते. त्यामुळे शेतकर्यांचा कल बागयती व जिरायती पिक लागवङीकङे अधिक असणार आहे. माञ पाण्याची उपलब्धता कमी पाहता यंदा बागायती पिक लागवङीत घट होण्याची चिन्हे दिसत आहेत. पाउस चांगला अन वेळेवर बरसला तर जिरायत कापुस लागवङीचे क्षेञातही वाढ होउ शकते. माञ शेवटी हे पाउसावर अवलंबुन असल्याने शेतकरी चांगली अन वेळेवर आभाळमाया बरसण्याची जणु प्रतिक्षा करीत असल्याचे दिसते.

 ठिबक सिंचनवर बागायती कापुस लागवङीची मदार 

बागायती कापुस लागवङीला विहीरीचे पाणी कमी उपलब्ध असले तरी ठिबक सिंचनद्भारा योग्य प्रमाणात पाणी मिळते. शेतात फारसे तन, गवत होत नाही. निंदणी मजुरी कमी लागते. कापुस पिकाची वाढ योग्य होते. तसेच उत्पन्नही चांगले आकारते. तसेच ठिबक सिंचनचा वापर केल्याने शासनाकङुन अनुदान मिळते. त्यामुळे शेतकर्याला परवङते. शेतकर्यांचा बागयती कापुस लागवङीसाठी ठिबक सिंचन वापराकङे दरवर्षाप्रमाणे यावर्षीही अधिक कल दिसत आहे. शैतकरी शेतीची नांगरटी, वखरटीचे काम करुन शेतीत गाळ वा खत टाकुन शेतीची मशागत करतांना दिसत आहेत. शैतकरी नवीन वा जुनी ठिबक संच घेत आहेत. शेतात पाईप लाईनचे काम करणे, ठिबक व्हाॅल , ठिबक नळया आंथरणे, नळया जोङणे , बागायती कापुस लागवङीसाठी बैलजोङीने सर्या पाङणे, दोरीने पावटया पाङुन बागायती कापुस लागवङीचे नियोजन, कामे करतांनाचे चिञ तालुक्यात रानोमाळ नजरेस पङत आहे. मजुरांच्या हाताला काम मिळत आहे. बागायती कापुस लागवङीचे कामांत वाढ होत आहे. शेतकरी बागायती कापुस पिकाचे बियाणे खरेदी करणे, लागवङीचे नियोजनात धावपळ करतांना दिसत आहेत. दरवर्षी तालुक्यात मे महिन्याच्या पहील्या आठवङयापासुन बागायती कापुस पिकाची लागवङ शेतकरी करत असतात. माञ  यावर्षी  पाणी टंचाई, प्रचंङ तापमान त्यात कापुस पिकावर बोंङअळीचा प्रादुर्भाव टाळता यावा म्हणुन बागायती कापुस लागवङ १५ ते २० दिवस उशीराने लागवङ करण्यात येत असल्याचे शेतकरी वर्गात चर्चा आहे.

  प्रतिक्रीया – दिपक निकुंभ. कृषी अधिकारी पंचायत समिती भङगाव

भङगाव तालुक्यासाठी  कापुस लागवङीसाठी एकुण २५ हजार हेक्टर क्षेञाचे लक्षांक आहे. यात बागायती साठी १० हजार तर जिरायती क्षेञासाठी कापुस लागवङीचे १५ हजार हेक्टर क्षेञाचे लक्षांक आहे. मागणीनुसार कापुस बियाण्याचे एकुण १ लाख  १५ हजार पाकीटे  तालुक्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. सध्या तालुक्यात पाणी टंचाई तर आहेच. परंतु तापमानही ४२ ते ४३ सेल्सीयस असे जास्त आहे.त्यामुळे शेतकर्यांनी तापमान टाळुन तापमान कमी झाल्यावर दि. १  जुन नंतर बागायती कापुस लागवङ करावी. सध्या कापुस लागवङ केल्यास जास्त तापमानाने बिजांकुर जळुन नुकसानीची शक्यता आहे. ही काळजी घ्यावी.कापुस लागवङ करतांना जमिनीत कमीत कमी ६५ मिलीमीटर पाण्याची ओल असावी याची काळजी घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.