भगवान महावीर जयंतीनिमीत्त 29 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

जळगाव;-
श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीतर्फे भगवान महावीर यांच्या जयंतीनिमीत्त . 25 ते 29 रोजी पर्यंत पाच दिवस विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करुन जयंतीउत्सावाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समीतीचे अध्यक्ष दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील सकल जैन समाज व श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीतर्फे भगवान महावीर यांच्या जन्मोत्सवाचे आयोजन करीत असते. यंदा देखील या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 25 रोजी सकाळी 7 वाजता आर. सी. बाफना स्वाध्याय भवनात सजोडे सामुहिक सामायिक हा कार्यक्रम घेण्यात आला .
यामध्ये जैन समाजातील सुमारे 1008 समाजबांधवांनी एकत्रीत येवून 48 मिनीटे देवाचे नामस्मरण केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. सुरेशदादा जैन प्रमुख अतिथी म्हणून माजी खा. ईश्‍वरलाल जैन, आर. सी. बाफनाचे संचालक रतनलाल बाफना, जैन इरिगेशनचे संचालक अशोक जैन, माजी महापौर रमेशदादा जैन, गिरधारीलाल ओसवाल उपस्थित होते.
तरी जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल जैन संघातर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस महेंद्र जैन, स्वरुप लुंकड, रिकेश गांधी, विपीन चोरडीया, प्रविण छाजेड उपस्थित होते.त्यानंतर दि. 26 रोजी दुपारी 4.30 वाजता सद्भावना मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी झालेल्यांसाठी विविध नामफलक स्पर्धा घेण्यात येणार आहे. यात बेटी बचाओ, पाणी वाचवा या विषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता पांझरापोळ संस्थानात गौमातेला लापसी अर्पण करण्यात येणार आहे.
त्यानंतर 9.30 वाजेपासून बालगंधर्व खुले नाट्यगृहात मांडना मांडनेची स्पर्धा, ग्रिटींग कार्ड, भगवान महावीर की पट्टावली, वकृत्व स्पर्धा, महावीराष्टक स्तोत्र या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 7.30 वाजता युवा जीवन परिवर्तन आंतराष्ट्रीय बैंगलोर येथील नायक राहूल कपुर (जैन) यांचे महावीर का महाविज्ञान या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे. दि. 28 रोजी सकाळी 7.30 वाजता खान्देश सेंट्रल माॉल येथे ट्रेझर हंट या स्पर्धेचे तर सकाळी 9 वाजता आरसीबाफना स्वाध्याय भवनात राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी पुण्यस्मृत्युर्थ गुणानुवाद सभा तर सायंकाळी 7 वाजता बालगंधर्व खुले नाट्यगृहात भगवान आदिनाथ, भगवान महावीर तिसरे भव यावर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. 29 रोजी सकाळी 7.30 वाजता श्री वासुपूज्यजी जैन मंदिरात ध्वज वंदन होणार आहे. सकाळी 8 वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता मंगलाचरण, स्वागत गीत, ध्वाजारोहण, भगवान महावीरांना माल्यार्पण व दीपप्रज्वलन, गौतम प्रसादी, देहदान करणार्या प्रिय व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर शारिरीक, मानसिक, आरोग्यवर्धक जैन सिद्धांतांचे विशेष तज्ञ मानसी जैन हे समाजबांधवांना मार्गदर्शन करणार आहे. सकाळी 9.30 वाजता रक्तदान, मधुमेह तपासणी शिबीराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी 3 वाजता श्री वासुपूज्यजी जैन मंदिरात पंचक्याणक पूजा करण्यात येणार आहे. दि. 30 रोजी एसएमआयटी महाविद्यालयाजवळ अर्हम येथे आचार्य श्री रामलालजी मसा यांच्या जन्मोत्सवानिमीत्त नवकार मंत्र जप करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.