‘ब्रेक द चेन’अंतर्गत राज्यात काय सुरू व काय बंद असेल, जाणून घ्या संपूर्ण नियमावली

0

मुंबई  : राज्यावरील कोरोनाचे संकट निवारण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बुधवार दि १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून दि १ मे पर्यंत राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. १४४ कलम लागू करण्यात आले आहे.

दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना दिलासाही देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबींवर कुठलेही निर्बंध न ठेवता इतर महत्त्वाच्या गोष्टींचा विचार करून निर्बंध जारी करण्यात आले आहेत.

त्याअंतर्गत काय सुरू राहील व काय बंद असेल, कुठल्या सेवा, आस्थापना सुरू असतील, कुठल्या बाबींसाठी सूट असेल आदींबाबतची माहिती जारी करण्यात आलेल्या नियमावलीत देण्यात आली आहे. ती खालीलप्रमाणे….

ब्रेक द चेन’ची नवी नियमावली :

1. राज्यात कलम 144 आणि रात्रीची संचारबंदी लागू होणार

2. कारणांव्यतिरिक्त कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी फिरू शकणार नाही

3. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणं, उपक्रम, सेवा बंद राहतील

4. जीवनावश्यक श्रेणीत मोडणाऱ्या सेवा आणि व्यवहार यातून वगळण्यात आले आहेत.

5. अपवादश्रेणीत असलेली सेवा आणि व्यवहार सकाळी सात ते रात्री ८ या वेळेत कार्यालयीन दिवसांसाठी वगळण्यात आल्या आहेत.

6. मोलकरणी, घरगुती कामगार, वाहन चालक, वैयक्तिक निगारक्षक यांची सेवा अपवादश्रेणीत घेण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घ्यायचे आहेत.

7. उपहारगृह, बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहतील, फक्त होम डिलिव्हरी किंवा टेक-अवेसाठी परवानगी

8. मनोरंजन, दुकाने, मॉल ,शॉपिंग सेंटर इत्यादी सर्व सिनेमा हॉल बंद राहतील.

9. नाट्यग्रह तसेच थेटर पूर्णपणे बंद राहतील.

10. उद्याने, व्हिडीओ गेम, पार्लर बंद राहतील.

11. वॉटर पार्क, जलतरण तलाव, जिम, क्रीडा संकुले बंद राहतील.

12. चित्रपट /चित्रवाणी /मालिका /जाहिरातींसाठीच्या शूटिंग बंद असतील.

13. आवश्यक सेवा न देणारी सर्व दुकाने, मॉल, शॉपिंग सेंटर बंद राहतील.

14. समुद्रकिनारे, उद्यान, खुली जागा सारखे सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील.

15. धार्मिक प्रार्थनास्थळे बंद राहतील

16.नाभिक दुकाने / सौंदर्य प्रसाधन केंद्रे / केश कार्तानालये बंद राहतील

17. शाळा, कॉलेज आणि खासगी शिकवणी बंद राहतील

18. कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक किंवा राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नाही

19. विवाह समारंभासाठी 25 लोकांना परवानगी

20. अंत्यविधीसाठी फक्त 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी

 

-जीवनावश्यक श्रेणीत या बाबींचा समावेश

1. रुग्णालये, निदान केंद्रे, दवाखाने, लसीकरण, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषध कंपन्या, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा ज्यात उत्पादन आणि वितरणसंबंधी आस्थापना असतील. तसेच वितरक, वाहतूकदार, पुरवठा साखळीतले लोक. लशींचे उत्पादन आणि वितरण, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे, इतर पूरक उत्पादने आणि सेवा.

2. पाळीव प्राण्यांसाठीची खाद्यादुकाने, प्राण्यांसंबंधी सेवा, प्राण्यांचे निवारागृह इत्यादी.

3. वाण्याची किराणा सामानाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दूध डेअरीज, बेकऱ्या, सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने

4. शीतगृहे आणि वखारसेवाविषयक आस्थापना

5. सार्वजनिक वाहतूक – हवाई सेवा, रेल्वेसेवा, टॅक्सी, रिक्षा आणि सार्वजनिक बसगाड्या.

6. विविध राजनैतिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन आणि अनुषंगिक सेवा

7. स्थानिक प्रशासनांच्या मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्ती कामे

8. स्थानिक प्रशासनाची सर्व सार्वजनिक कामे

9. ऱिझर्व्ह बँक आणि तिनं आवश्क ठरवलेली सर्व कामे

10. सेबीनं मान्यताप्राप्त ठरवलेली सर्व कामं ज्यात स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिरी, क्लिअरिंग संबंधीची कामं अशी कामे

11. दूरसंचार सेवांशी संबंधित सेवा, देखभाल दुरुस्ती

12. मालवाहतूक

13. पाणीपुरवठा विषयक सर्व कामे, सेवा

14. शेतीशी संबंधित सर्व कामे आणि शेती निरंतरपणे होऊ शकेल यासाठीची सर्व कामे. य़ात बीबियाणे, खते, उपकरणे आणि दुरुस्ती हे सर्व समाविष्ट आहे.

15. आयात निर्यात विषयक सर्व व्यवहार

16. जीवनावश्यक वस्तूविषयक ई-कॉमर्स

17. अधिस्वीकृतीप्राप्त माध्यमकर्मी

18. पेट्रोल पंप आणि पेट्रोलसंबंधी उत्पादने, सुदूर समुद्रात वा किनारपट्टीवरील उत्पादने

19. सर्व प्रकारच्या कार्गो सेवा

20. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या सर्व प्रकारच्या क्लाऊडसेवा, डेटा सेंटर्स आणि पायाभूत सुविधांसाठीच्या महत्त्वाच्या माहिती-तंत्रज्ञानविषयक सेवा

21. सरकारी आणि खासगी सुरक्षारक्षक सेवा

22. विद्युत तसेच गँसपुरवठा सेवा

23. एटीएम आणि तत्संबंधीच्या सेवा

24. टपालसेवा

25. बंदरे आणि ततस्बंधीच्या सेवा

26. लस तसेच इतर जीवरक्षक औषधे आणि औषधी उत्पादकांचे कस्टम हाऊस एजंट तसेच परवानाधारक मल्टिमोडल वाहतूकदार

27. कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंचे कच्चे माल किंवा वेष्टनसामुग्री बनवणारे कारखाने

28. आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमधे कार्यरत कारखाने

29. स्थानिक आपत्तीनिवारण प्राधिकरणाने जीवनावश्यक ठरवलेली कोणतीही सेवा

जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी मार्गदर्शक तत्त्व काय?

1. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानाने कार्यरत राहताना कोविडसुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे. म्हणजे दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यांनी आणि ग्राहकांनीही दुकानाच्या परिसरात तसे वागायला हवे.

2. जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानमालकाने तसेच कर्मचाऱ्यंनी लवकरात लवकर लशीकरण करून घेणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकाशी पारदर्शक काचेच्या मधून किंवा इतर संरक्षक पदार्थांच्या द्वारे संपर्क करणे, इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे वळते करणे अशी सुरक्षाविषयक काळजी घ्यायला हवी.

3. या नियमांचा भंग करणाऱ्या दुकानमालक, कर्मचारी किंवा ग्राहकाला पाचशे रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडसंसुसंगत वागणूकीचा भंग करणाऱ्या ग्राहकाला माल दिला जात असेल तर दुकानाला एक हजार रुपये दंड केला जाईल. तसेच कोविडविषयक संकटाची अधिसूचना संपेपर्यंत दुकान बंद करण्याची कारवाईही केली जाऊ शकेल.

4. जीवनावश्यक वस्तू दुकानातले व्यवहार करण्यासाठी कर्तव्यपूर्तीसाठी कामगारांची वाहतूक हे वैध कारण धरले जाईल.

5. वाण्याचे दुकान, भाजीपाला दुकान, फळविक्रेते, दूधदुकाने, बेकऱ्या, खाद्यपदार्थ दुकाने या सर्वांच्या संदर्भात दाट लोकवस्तीच्या ठिकाणी दुकाने आहेत का? किंवा दुकानांमध्ये गर्दी होते आहे का? याबद्दल स्थानिक प्रशासनाने वेळोवेळी अभ्यास करून दुकानांच्या वेळा बदलणे तसेच दुकानांच्या वेळा निर्धारित करून देणे आवश्यक आहे.

6. खुल्या मैदानांच्या जागा मोकळ्या जागा निर्धारित करून काही दुकाने हलवणे शक्य आहे का, तात्पुरत्या स्वरूपाची दुकानं सुरू करता येतील का, हे बघणेही आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने सर्व प्रकारचे उपाय योजणे गरजेचे आहे ज्याद्वारे हे जीवनावश्यक व्यवहार कोविड पसरण्याला निमंत्रण देणारे ठरणार नाहीत. स्थानिक प्रशासन काही व्यवहार बंदही करू शकेल.

7. सध्या बंद असलेल्या सर्व दुकानांना सल्ला देण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या सर्व कामगारांचे लशीकरण करून घ्यावे. तसेच ग्राहकांशी संपर्क काचेच्या संरक्षक कवचाच्या माध्यमातून यावा, ही पूर्वकाळजी घेण्याची सुविधा निर्माण करावी आणि इलेक्ट्रॉनिक पेमेंट पद्धतीचाही अवलंब करावा ज्याद्वारे त्यांची दुकाने कोणत्याही प्रकारे कोविड संसर्ग न पसरवता कार्यान्वित केली जाऊ शकतील.

🛑सार्वजनिक वाहतुकीसाठी निर्बंध काय?

💠अटोरिक्षा = चालक अधिक २ प्रवासी

💠टँक्सी (चारचाकी) = चालक अधिक पन्नास टक्के वाहन क्षमता

💠बस = पूर्ण प्रवासीक्षमता, उभे प्रवासी बंदी

➡️सर्व प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करताना तोंडाला मास्क लावणे सक्तीचे आहे. मास्क नसल्यास पाचशे रुपये दंड केला जाईल

➡️चारचाकी टँक्सीमधे एखाद्या प्रवाशाने मास्क न घातल्यास तो प्रवासी आणि चालकालाही पाचशे रुपये दंड केला जाईल. प्रत्येक खेपेनंतर वाहनं सॅनिटाईझ करणे आवश्यक आहे

➡️भारत सरकारच्या नियमानुसार सर्व प्रवासी वाहनांचे चालक आणि इतर कर्मचाऱ्यांनी लशीकरण करणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी कोविड सुसंगत वागणुकीचे दर्शन घडवणेही गरजेचे आहे. टँक्सी आणि अटोरिक्षांसाठी चालकाने स्वतःच्या आणि प्रवास्यांच्यामधे प्लास्टिकचे आवरण घालून संरक्षक कवच निर्माण करायला हवे.

➡️सार्वजनिक वाहतुकीसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवास हे वैध कारण असेल.

➡️बाहेरगावच्या ट्रेन्ससाठी रेल्वेप्रशासनाने उभे राहून कोणीही प्रवासी प्रवास करणार नाहीत, याची खातरजमा करावी. तसेच सर्व प्रवासी मास्क लावतील, हेही बघावे.

➡️कोविडसुसंगत वागणूक न केल्यास पाचशे रुपयांचा दंड सर्व ट्रेन्समधेही लावावा. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी देतानाच ती सुरळीतपणे व्हावी, यासाठी लागणाऱ्या नैमित्तिक सेवाही त्यात समाविष् करूनच ही परवानगी देण्यात आलीय. त्यात हवाईसेवेसाठी विमानतळावर दिल्या जाणाऱ्या कार्गोसारख्या सेवा तसेच तिकीटविषयक सेवांचाही समावेश आहे.

➡️सार्वजनिक वाहतुकीने म्हणजे बस, ट्रेन किंवा विमानाने आलेल्या प्रवाशाला येताना किंवा जाताना घरी जाण्यासाठी वा घरून येण्यासाठी करावा लागणारा प्रवास वैध प्रवासतिकीट दाखवून करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.