जयपूर: काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कारागृहात असलेल्या अभिनेता सलमान खान जामीन मंजूर झाला आहे. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला 50 हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.
कोर्टात आज सकाळी 10.30 वा. पासून दोन्ही पक्षाचा वकिलांचा युक्तीवाद सुरु झाला. सलमानच्या वकिलांनी जामीनासाठी पूर्ण दावा केला. तर सरकारी आणि बिष्णोई समाजाच्या वकिलांनी सलमानच्या जामीनाला तीव्र विरोध केला. सुमारे 2 तास हा युक्तीवाद सुरु होता. त्यानंतर कोर्टाने ब्रेक घेऊन, दुपारी 3 वा. सलमानला जामीन मंजूर केला.

जोधपूर न्यायालयात सलमानच्या वकिलांसोबत त्याची बहीण अल्विरा, अंगरक्षक शेरादेखील उपस्थित आहे.
जोधपूर न्यायालयाचे वकील रवींद्र जोशी यांची बदली झाल्यानंतर उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. मात्र बदलीची ऑर्डर अद्याप मिळालेली नसल्यानं न्यायाधीश रवींद्र जोशीच सलमानच्या जामिनाची सुनावणी करत आहेत.
काल राजस्थान हायकोर्टाकडून रात्रीतून तब्बल 87 न्यायाधीशांच्या बदल्या केल्या गेल्या. यात जोधपूर न्यायालयाचे न्यायाधीश रवींद्र जोशी यांचाही समावेश आहे. त्यांच्या जागी आता सूर्यकुमार पारीख हे नवे न्यायाधीश होणार आहेत.


