Monday, January 30, 2023

ब्रेकिंग न्यूज ; चाळीसगाव येथे माजी नगरसेवक प्रभाकर चौधारींवर प्राणघातक हल्ला

- Advertisement -

चाळीसगाव (प्रतिनिधी) ; चाळीसगाव नगरपालिकेचे माजी नगरसेवक भाजपा युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष प्रभाकर पांडुरंग चौधरी यांच्यावर आज सकाळी साडे अकराच्या सुमारास प्राणघातक हल्ला करण्यात आला.

याबाबत असे की माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी हे मागील गुन्ह्यासंदर्भात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सह्या करून पोलीस स्टेशन बाहेर निघत असताना,  पोलिस स्टेशनच्या आवारातच त्यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. समजलेल्या माहितीनुसार ही घटना मागील वैमनस्य तून घडली असून जगदीश महाजन , दादू जगदीश महाजन संजय घटी सौरभ संजय  घटी यांनी हा  हल्ला घडवून आणल्याचे समजते .

या हल्ल्यानंतर प्रभाकर चौधरी यांना तातडीने चाळीसगाव शहरातील देवरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून देवरे यांनी प चौधरी यांची प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबाद येथे हलविण्याचे सांगितले,

- Advertisement -

या गंभीर घटनेची पोलीस खबरदारी घेत असून गुन्हा दाखल होणे बाकी आहे,

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे