लंडन : कोरोनाची लागण झालेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना सोमवारी उशिरा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. बोरिस जॉन्सन यांना 10 दिवसांपूर्वीच कोरोनामुळे ग्रस्त असल्याची पुष्टी झाली आणि त्यानंतर त्याला डाउनिंग स्ट्रीटमध्ये वेगळं ठेवण्यात आलं.
बोरिस जॉनसन यांना कोरोनाची लागण झालेली माहिती २७ मार्चला समोर आली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. ते तेथून आपलं काम करीत होते आणि देशात राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत होते. दरम्यान, रूटीन चेकअपसाठी ते रुग्णालयात गेले असता तब्येत बिघडल्यामुळे त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.

बोरिस यांना वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते, जे त्याने स्वतः ट्विटरवर उघड केले होते. जॉन्सनने लिहिले, ‘डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविवारी मी रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात गेलो. कारण आजही मला कोरोनाची लक्षणे आहेत. मी माझ्या टीमशी संपर्कात आहे, कारण आपण एकत्र या व्हायरसशी लढा देऊ आणि सर्वांना सुरक्षित ठेवू. त्यांनी आणखी एक ट्विट केले होते, ‘मला या एनएचएसच्या सर्व स्मार्ट कर्मचार्यांचे आभार मानायचे आहेत. जे या कठीण अशा काळात माझी आणि इतरांची काळजी घेत आहेत. कृपया सर्व सुरक्षित रहा आणि एनएचएस आणि जीवन वाचवण्यासाठी घरात रहा.’ असे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान जॉन्सन यांच्या जागी परराष्ट्रमंत्री डोमिनिक राब सध्या कामावर देखरेख ठेवतील.


