बोहर्डी बु येथील सरपंचाची आत्महत्या

0

भुसावळ : तालुक्यातील बोहर्डी बु ॥ येथील सरपंच यांनी दि ५ मंगळवार रोजी रात्री शेती व व्यवसायाच्या नैराश्यातून विषारी द्रव्य सेवनकरुन आत्महत्या केल्याची घटना घडली.निलेश भिमसिग पाटील (३६) असे या मृत सरपंचाचे नाव आहे.

याबाबत सविस्तर असे की, बोहर्डी बु ॥ येथील सरपंच निलेश पाटील यांनी मागील एका वर्षापासुन गावा जवळील हॉटेल भाडयाने घेतले होते व शेती जोड व्यवसाय गेल्या दोन महिण्या पासुन बंद असल्याने व शेती माल विकण्यासाठी बाजार नसल्याने हात उसन वारी घेतलेले पैसे परत कसे करायाचे. याच नैराश्यातून त्यांनी मंगळवारच्या रात्री ११ ३० वाजेच्या सुमारास गावा जवळील पाटील ढाबा येथे जाऊन काहीतरी विषारी द्रव्य सेवन केल्याने त्यांना मळमळ व ओकारी आल्याने येथे उपस्थीताच्या लक्षात येताच त्यांना तात्काळ वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारा साठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यु झाला.

याबाबत वरणगाव पोलीसात सुरेद्र ईश्वरसिगं राजपूत यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा तपास पो नाईक नरसिंग चव्हाण हे करीत आहे.
मयत निलेश यांच्या पश्यात आई , वडिल, पत्नी दोन मुली असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.