बोहरा गल्लीतील हार्डवेअरच्या दुकानातून आठ हजाराची रोकड लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील बोहरा गल्ली येथील हार्डवेअर दुकानाच्या ओटावरून कापडी पिशवीतील आठ हजाराची रोकड अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुझर अब्बासभाई बदामी (वय ५७,  रा. पंचमुखी हनुमान मंदीरामागे, रणछोडदास नगर जळगाव) हे कामाच्या निमित्ताने अकबरअली शेख अब्दुल हुसैन हार्डवेअर दुकानावर कामाच्या निमित्ताने काल सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गेले. त्यावेळी ते दुकानाच्या ओट्यावर बसले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने जुझार यांच्या ताब्यातील ८ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.