जळगाव, दि.20 –
तालुक्यातील बोरनार येथे घरात गॅस हंडी लावतांना गॅस लिकेज होवून घराला आग लागल्याची घटना सोमवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास घडली. या आगीत संसारोपयोगी वस्तूंसह घरातील 14 हजार रुपये रोख जळून खाक झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.
बोरनार येथे राहणारे विनायक कालीराम चौधरी यांच्या घरात सोमवारी गॅस हंडी लावताना गॅस लिकेज झाला होता. त्यामुळे सायंकाळच्या सुमारास घराला अचानक आग लागली. आगीमध्ये घरातील कपाटामध्ये ठेवलेले 14 हजार 600 रुपये रोख व घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या आगीबाबत एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Prev Post