बोदवड (प्रतिनिधी) – शहरातील बसस्थानकातून बस मध्ये चढत असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या इसमाच्या खिशातून ३७ हजार पाचशे रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक असे की,दि.२० रोजी सकाळी ८:५५ वाजेच्या सुमारास औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज येथील रामदास मोहन चिमवार (रा.शिवाजी नगर,साई कॉलनी) हे सकाळी ९ वाजेच्या सुमारास बोदवड बसस्थानकवरून सकाळी ८:५५ वाजता उभ्या असलेल्या बोदवड ते पुणे बसस्थानकमध्ये चढत असतांना व यावेळी झालेल्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने रामदास मोहन चिमवार यांच्या खिशातील ३७,५०० (सदोदित हजार पाचशे रुपये ) लंपास करीत पोबारा केला.
याप्रकरणी रामदास मोहन चिमवार यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यांचा पुढील तपास पो.हे.कॉ.कालिचरण बिऱ्हाडे करीत आहेत