बोदवड शहरात किराणा मालाची चढ्या भावाने विक्री

0
बोदवड – कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता शासनाने लावलेल्या संचारबंदीचा फायदा शहरातील काही किराणा दुकानदार घेत असल्याची चर्चा असुन शहरातील मलकापूर रोडवरील प्रितम शांतीप्रकाश खत्री यांच्या मालकीचे अमर प्रोव्हीजन येथे वाजवी पेक्षा जास्त किंमतीने किराणा मालाची वस्तुची विक्री केली जात असल्याने बोदवड शहरातील दिपक संतोष माळी यांनी याबाबत संबधित किराणा दुकानदारांवर ग्राहक संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशी तक्रार तहसिलदार रविद्र जोगी यांच्याकडे केली असून या तक्रारीच्या अनुषंगाने नायब तहसीलदार दीपक कुसकर यांना संबधित दुकानावर जावून पंचनामा केला आहे.यावेळी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील,तक्रारदार दिपक माळी उपस्थित होते.याबाबत सखोल चौकशी करून संबधितांवर कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल तहसिल कार्यालयाकडे पाठवण्यात यावा असे चौकशीचे आदेश तहसिल प्रशासनाकडून पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहेत.
संचारबंदी लागु झाल्यापासुन शासन नागरिकांची कोणत्याची प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी विविध स्तरावर उपाय योजना करीत असुन जिवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी किराणा दुकाण,मेडिकल दुध यांसह दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय घेत नागरिकाच्या सोयीसाठी अन्न धान्य पुरविण्यासाठी सुविधा करीत आहे.तसेच शहरात विविध सेवा भावी नागरिक मोलमजुरी करणाऱ्यांसाठी जिवनाश्यक वस्तुचे वाटप करुन मदतीचा हात पुढे करीत असतांना शहरातील काही किराणा दुकानदार वाजवीपेक्षा जास्त किमंतीन तेल, साखर,तादुळ,दाळ इत्यादी वस्तुचे चढया भावाने विक्री करीत असल्याने नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर पडत असल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.