बोदवड शहरातील प्रभाग क्रं.४ मधील कत्तलखाना तात्काळ बंद करावा

0

पॅंथर्स रिपब्लिकन पार्टी तर्फे मुख्याधिका-यांना निवेदनाद्वारे मागणी

बोदवड – शहरातील प्रभाग क्रं.४ मधील भीम नगर येथे अनाधिकृतपणे उघडल्यावर बिनधास्तपणे जनावरांची सुरू असलेली मांस विक्री तात्काळ थांबवून येथील कत्तलखाना तात्काळ बंद करावा अशी मागणी पॅंथर्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल भानुदास मोरे व पदाधिकाऱ्यांनी नगर पंचायत मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात येथील परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अनाधिकृतपणे तसेच उघडल्यावर जनावरांची मांस विक्री केली जात असून येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.तसेचं येथील रस्त्यावरून ये-जा करणा-या महिला व शाळेकरी विद्यार्थ्यांना यामुळे येत असलेल्या दुर्गंधीमुळे नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

येथे अधिकृतपणे कोणत्याही प्रकारच्या कत्तलखान्याची परवानगी दिली नसतानाही येथे हा प्रकार सर्रास सुरू असून या मांस विक्रीतील उरलेले अवशेषांची विल्हेवाट इतरत्र न लावता येथील व्यापारी याचं परिसरातचं टाकत असल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे येथील परिसरात येणाऱ्या नागरिकांना चुकीचा संदेश जात आहे.

या गंभीर विषयाकडे नगर पंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिसरातील ही अनाधिकृतपणे सुरू असलेली मांस विक्री व कत्तलखाना तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा भविष्यात यामुळे काही विपरीत परिणाम झाल्यास नगर पंचायत प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देतेवेळी रिपब्लिकन पार्टीचे रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष राहुल मोरे यांसह जगन मोरे,अरविंद तायडे,मिलिंद तायडे,युवराज तायडे,प्रकाश तायडे,अमोल मराठे,प्रविण गुरचळ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.