बोदवड येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

0

बोदवड प्रतिनिधी

येथे 64 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त स्टेशन मास्तर के.एल.बोदडे होते.
तर जनसेवक विनोद पाडर,भारतीय बौद्ध महासभेचे तालूका अध्यक्ष अशोक तायडे, जिल्हा पर्यटन सचिव बी.के.बोदडे(सर) विपश्यना साधक रामकृष्ण गवई आदींनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर का केले?
हिंदू धर्मातील अंधश्रध्दा,विषमता,स्त्री – पुरूष असमानता,कर्मकांड,रुढी परंपरा याला कंटाळुन त्यांनी तथागत भगवान बुद्ध यांचा बौद्ध धम्म स्वीकारून भारतात नवें परिवर्तन घडवून आणले असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या प्रसंगी सलीम भाई असलम बागवान, के.एस.सुरवाडे,महेंद्र सुरळकर, भास्कर गुरचळ,वामन निकम सर, बी.यु.पानपाटील, व्ही. बी.सोनवणे सर, चेतराम सुरळकर जीवन पालवे, राजू तायडे, विनोद तायडे, समाधान बोदडे, बाबुराव इंगळे, सुखदेव शिरसाठ,विष्णु तायडे, महेंद्र गायकवाड, शामराव बोदडे, प्रधान गुरुजी, देवेन्द्र वारडे संजय निकम सर, सुरेश तायडे, सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रमनेर शांताराम मोरे यांनी पंचशील ग्रहण करून कार्यकक्रमाची सुरुवात केली तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन गोपीचंद सुरवाडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.