बोदवड येथे आ.चंद्रकांत पाटलांच्या हस्ते शिवभोजन थाळीचे उद्घाटन

0

बोदवड – शहरातील तहसिल कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या न.ह.रांका शाळेसमोर आ.चंद्रकांत पाटिल यांच्या हस्ते ‘शिवभोजन थाळी योजना’ केंद्राचे ऊद्घाटन संपन्न झाले.यावेळेस सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळत गरजू व निराधारांसाठी दररोज १२ ते ३ यावेळेत फक्त पाच रुपयात शिवभोजन थाळी योजना सुरु झाली आहे.या थाळीत चपाती २ नग,एक वाटी भाजी,एक वाटी वरण,भात याचा समावेश असणार आहे.त्यामूळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी गरजू व निराधारांसाठी प्रभावी ठरत आहे.

राज्यातील तालुकास्तरावरील पहिली शिवभोजन थाळी मुक्ताईनगर मध्ये सुरु करण्यात आल्यावर,बोदवड शहरातही शिवभोजन थाळी योजना सुरु व्हावी यासाठी आमदार चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मुक्ताईनगर मतदार संघात एकही निराधार गरजू गोरगरीब उपाशी राहणार नाही यासाठी ५ रुपयात जेवण हि संकल्पना या मागची आहे.त्यासाठी बोदवड शहरात ७५ थाळ्या मंजूर झाल्यावर उद्घाटनाप्रसंगी शिवभोजन केंद्रामार्फत गरजू व निराधार लोकांना याचा लाभ मिळावा यासाठी भोजनचालक शांताराम कोळी यांनी विशेष काळजी घेण्यासंदर्भात सुचना आमदार चंद्रकांत पाटिल यांनी यावेळेस केल्या.

मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून व आमदार चंद्रकांत पाटिल यांच्या प्रयत्नांतून तालुक्यात गरजू व निराधारांसाठी शिवभोजन थाळी हि योजना सुरु करण्यात आली आहे. तालुक्यातील कोणत्याही गावात गरजू,निराधार व दिव्यांग व्यक्ती असल्यास त्यांनी शिवभोजन केंद्राला संपर्क करावा,त्यांना जेवणाचे पार्सल घरपोच पोहोचविण्यात येणार असल्याचे शिवसेना तालुका संघटक शांताराम कोळी यांनी यावेळेस सांगितले.

यावेळेस आमदार चंद्रकांत पाटिल,तहसिलदार रविंद्र जोगी, मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले , जिल्हा परिषद नियोजन समिती सदस्य अँड.मनोहर खैरनार उपस्थित होते.

यावेळेस शिवभोजन केंद्राला १२ ते ३ या वेळेस माजी सभापती विरेंद्रसिंग पाटिल,डॉक्टर उद्घव पाटिल,शिवसेना मुक्ताईनगर शहर संघटक वसंत भलभले,दिपक पवार,नगरसेवक आनंदा पाटिल, तालूकाप्रमूख गजानन खोडके, नगरसेवक दिपक झांबड , नगरसेवक सुनिल बोरसे, नगरसेवक देवेंद्र खेवलकर,ईश्वर जंगले,प्रमोद धामोळे,कलिम शेख,दिपक माळी,सुभाष देवकर , धनराज गंगतीरे,गोपाल पाटिल, पंकज वाघ,नईम खान तसेच शहरातील विविध लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवभोजन केंद्राला भेटी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.