बोदवड येथे आदिवासी संघर्ष समितीची मिटिंग बैठक

0

बोदवड – आगामी हिवाळी अधिवेशनावर दशरथ भांडे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा ९ डिसेंबर २०२० निघणार असुन यासाठी शहरातील शासकीय विश्राम गृह येथे नितीन कांडेलकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी समितीचे संयोजक ऍड.गणेश सोनवणे,उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रमुख प्रल्हाद सोनवणे, जळगाव जिल्हा कर्मचारी संघटना जिल्हाध्यक्ष मंगल कांडेलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.  याप्रसंगी बैठकीत तालुक्यातील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.त्यात जिल्हाउपाध्यक्ष सुरेश नारायण कोळी,जिल्हा कार्यकारणी सदस्य

शांताराम रामकृष्ण कोळी, समाधान जगदेव कोळी,तालुकाध्यक्ष  जगदीश मुरलीधर कोळी,कर्मचारी संघटना तालुकाध्यक्ष रवींद्र काशिनाथ तायडे यांची निवड करण्यात आली.सदर बैठकीला देविदास कोळी,भगवान कोळी,देविदास खेडकर,गणेश दोडे,आनंदा कोळी,राजु कोळी,चंद्रगुप्त सोनवणे,नगीनदास बागुल,सुरेश कोळी,अनिताताई कांडेलकर, मालती,संजय तायडे,पल्लवी कांडेलकर,समाधान धायडे,आकाश कोळी,संजय तायडे,गणेश कोळी,विक्की कोळी,अनिल धायडे,सागर कोळी,राहुल पडोळकर,पांडुरंग कोळी,सुरेश कोळी सर यांसह मोठया संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.