बोदवड येथे अपंग बांधवांना मोफत फार्म वाटप करून केला वाढदिवस साजरा

0

बोदवड – शहरातील अपंग संघटनेचे सचिन उगले यांनी त्यांच्या मुलगा नयन उगले याचा 7 वा वाढदिवस बोदवड तालुक्यातील व शहरातील दिव्यांग बांधवांना स्व:खर्चातून फार्म वाटून साजरा केला.

श्री.उगले यांनी बोदवड नगर पंचायत व ग्रामीण ग्रामपंचायत यांच्या कार्यालयातुन स्व:उत्पन्नातुन हे फार्म विकत घेऊन शासनाचा राखीव असलेला निधी दिव्यांग बांधवांना मिळावा,यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने दिव्यांग बांधवांना राखीव निधी मिळावा यासाठी मोफत फार्म वाटप केले. दिव्यांग बांधव शासनाच्या निधी पासुन वंचित राहू नये म्हणुन त्यांची सुरू असलेले धावपळ लक्षात घेता त्यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसावरील अतिरिक्त खर्च टाळून उगले यांनी हा उपक्रम राबविला असल्याचे याबाबत बोलतांना सचिन उगले यांनी सांगितले.

यावेळी वाढदिवसानिमित्त फार्म वाटप करतांना बोदवड अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष धनराज गायकवाड, किशोर बडगुजर,  संजय मिस्त्री, शाम लूंड,अजय पाटील, राहुल मोरे, राजेश बोदडे,  युवराज तायडे,अनिल भोई, पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठा प्रमाणात उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.