बोदवड येथील अनाधिकृत कत्तलखाना प्रकरणी नगरपंचायत प्रशासनाचा अंतिम इशारा

0

बोदवड – शहरातील प्रभाग क्रं.४ मधील भीमनगर येथे सुरु असलेल्या बेकायदेशीर कत्तल कारखान्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने संबधितांना कारवाईचा अंतिम इशारा दिला आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील भीमनगर परिसरात सुरु असलेल्या कत्तलखान्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून  येथील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने येथील हा कत्तलखाना बंद करावा अशा मागणीचे निवेदन बोदवड येथील राहुल भानुदास मोरे यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिले आहे.त्या अनुषंगाने नगरपंचायत प्रशासनाने संबंधितांना नोटीस बजावून कत्तलखाना बंद करावा असे आदेशीत केले होते.मात्र तरीही संबंधितांनी सदरचा कत्तलखाना चालूचं ठेवल्यामुळे आता अंतिम इशारा म्हणून येत्या १० दिवसात सुरू असलेला हा कत्तलखाना बंद करावा अन्यथा पोलीस संरक्षणाखाली कारवाई करण्यात येईल व त्यासाठी लागत असलेला खर्च आपल्याकडून वसूल करण्यात येईल अशा स्वरूपाचा अंतिम इशारा नगरपंचायत प्रशासनाने नोटिसव्दारा संबधितांना दिला आहे.त्यामुळे येथे सुरू असलेल्या अनाधिकृत कत्तलखान्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.  याबाबतची नोटीस नुकतीच नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांनी संबधितांना बजावली असून त्याची प्रत माहितीस्तव पोलीस प्रशासनाला सुद्धा देण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.