बोदवड :- बोदवड पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मुक्ताईनगर अतर्गत बोदवड ते मनूर खुर्द ग्रामिण मार्ग 17 या रस्त्याची दुरुस्ती सुरु असुन हि दुरुस्ती म्हणजे निव्वळ जनतेची व शासनाची फसवणूक आहे रस्त्या दूरुस्ती करताना रस्त्याच्या बाजूच्या कडा व पाँटहोल भरण्या आगोदर धूळ माती साफ केली जाते त्या नंतर खडी पसरविण्याच्या आगोदर खड्डयात डांबर मारुन त्या नंतर खडी पसरविली जाते परंतू बोदवड मनूर खूर्द रस्ते दूरुस्त करीत असतांना खडीच्या खाली डंबर न टाकता खडी पसरवून खड्डे भरण्याचे व रस्त्याच्या कडा भरण्याचे थातूर मातूर काम सुरू आसल्याचे दिसुन येते जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग थातूर मातूर मलम पट्टी करुन जंनतेचा व शासनाच्या तोडाला पाने पुसुन काम करीत असल्याचे दिसुन येते सबंधीत रस्त्यावर जिल्हा परिषद विभागाच्या कर्मचा-याच्या गैरहजरीत काम सुरु असल्याचे दिसुन आले.
या रस्ते दुरूस्ती कामाची तांत्रिक कर्मचा-याकडून चैाकशी झाल्या शिवाय रस्ते दूरुस्ती कामाचे देयके आदाकरु नये असे भारिप बहूजंन महासघाचे जिल्हासचिव गोपीचंद सुरवाडे यांनी आमच्या प्रतिनीधीशी बोलतांना सागितले
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Next Post