बोदवड तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करा !

0

पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड यांची तहसिलदारांकडे निवेदनाव्दारे मागणी

बोदवड (प्रतिनीधी) : तालुक्यात एकमेव सुरू असलेले शासकीय कापूस खरेदी केंद्र (सी.सी.आय.)गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने व कोरोना संकटात सापडलेल्या शेतक-यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परिणामी शेतकरी वर्गाकडून खाजगी बाजारपेठेत कमी भावाने कापूस खरेदी केली जात आहे.तर काही शेतकरी आर्थिक अडचणीत आल्याने व याचाचं फायदा घेऊन खाजगी बाजारपेठेत त्यांच्याकडून कमी भावाने कापसाची मागणी केली जात आहे.

शहरातील सुरु असलेले एकमेव कापूस खरेदी केंद्र गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने शेतक-यांचा माल घरातचं पडून आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

सदर कापूस खरेदी केंद्र आपल्या अधिपत्याखाली येत असल्याने व शेतक-यांची अडचण लक्षात घेऊन तालुक्यात सी.सी.आय.कापूस खरेदी केंद्र सुरु करावे अशी शेतकरी हिताची मागणी दिलेल्या निवेदनातून सभापती किशोर गायकवाड यांनी तहसिलदार हेमंत पाटील यांच्याकडे केली आहे.

निवेदन देताना बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड,भाजपा तालुकाध्यक्ष विनोद कोळी,यांचेसह भाजपाचे किरण वंजारी,भागवत टिकारे,सचिन राजपूत उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.