बोदवड | प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेशजी टोपे व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा आहे मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन केले आहे. या आवाहानाला प्रतिसाद देत युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांनी शहर तथा तालुका परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवून रक्तदान करावे असे आवाहन केले होते.या आवाहानाला परिसरातील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देत १५७ रक्तदात्यांनी आज दि.३१ मंगळवार रोजी जामनेर रोडवरील अग्रेसन भवनात रक्तदान शिबिरात रक्तदान केले.
कोरोना वाढता प्रसार पाहता लोकप्रतिनीधींनी जनतेत जनजागती करून,योग्य त्या उपाययोजना करून या भीतीच्या वातावरणात सुध्दा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी भावना जनतेबद्दल ठेवणे अपेक्षित आहे. मात्र येथे लोकप्रितिनीधींच कोरोनाच्या भीतीने घरात बसून असल्याचे चित्र दिसून येत आहेत.मात्र प्रा.हितेश पाटील यांनी ही कोरोनाची भीती झुंगारत ते गेल्या १५ दिवसापासून आपल्या परिने कोरोनाचा नायनाट करण्यासाठी संपुर्ण तालुक्यात अहोरात्र प्रयत्न करत असतांना दिसत आहे.
या आयोजित शिबिरास आ.चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली असता प्रा.हितेश पाटील यांच्या कार्याची प्रशंसा केली.
यावेळी विरेंद्रसिंग पाटील,काँग्रेस कमिटी शहरअध्यक्ष शेख मेहबुब, तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, शिवसेना तालुकाप्रमुख गजानन खोडके,दिलीप पाटील,आनंदा पाटील,देवेंद्र खेवलकर,इरफान शेख,डॉ.सुधीर पाटील,भारत पाटील,संभाजी साठे,विजय चौधरी,पुंजाजी पाटील,विजय पालवे,रामधन माळी,मनोज पाटील,दिपक माळी,विनोद बोदडे,आतिष सारवान,विजू चौधरी,विनोद मायकर आदी उपस्थित होते.