बोदवड – येथील पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नम्र फायनान्स च्या ऑफिस मध्ये रात्री तीन ते साडेतीन च्या दरम्यान चोरांनी बारा लाख रुपये वर डंल्ला मारला.
याबाबत अधिक असे की, सदर घटना घडण्याची वेळी नम्र फायनान्स चा एक सहकारी कैश असलेल्या बाजूच्या रूममध्ये झोपलेला होता.
विशेष म्हणजे नम्र फायनांस चे ऑफिसचे दरवाजे रात्री सताळ पने उघडे होते,असे त्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ज्या रूममध्ये बारा लाख रुपयांची चोरी झाली त्याच्या शेजारीच नम्र फायनांस चा संबंधित कर्मचारी अमोल मोरे झोपलेला होता.
कपाटाचा लॉक तोडून चोरी झाली त्याबाबत मला कसलाही आवाज आला नाही किंवा या घटनेबद्दल काहीच माहित नाही असा त्याचा सहकार्याचा म्हणणे आहे.
घटनेच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक संशयित नम्र फायनान्स च्या बाहेर तोंड बांधून हातात रॉड घेऊन फिरताना दिसत आहे.
सदर घटनेत एक पेक्षा अधिक लोक असल्याचा संशय असून याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.
ऐन सणासुदीच्या तोंडावर झालेली ही जबरी चोरी पोलिसांसमोर एक मोठा आव्हान ठरत आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.