बोदवड (प्रतिनिधी) :- सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) च्या 12 व्या सीझनची घोषणा केली, 20 वर्षांपूर्वी सुरू झालेला KBC हा बहुधा भारतीय टेलिव्हिजनवरील सर्वात प्रसिद्ध शो आहे. ज्ञानाच्या सामर्थ्याने सामान्य माणसाचे जीवन पालटून टाकणारा शो म्हणून KBC चा लौकिक आहे. खास गोष्ट म्हणजे यंदाच्या 12 व्या सीझनची रजिस्ट्रेशन प्रक्रिया 9 मेपासून सूरु झाली होती.
केबीसीच्या इतिहासात प्रथमच शोच्या रजिस्ट्रेशनपासून ते स्पर्धकांची निवड प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली.. स्मार्टफोन्सचा सर्वदूर झालेला प्रसार आणि सर्वसामान्य जागरूकता यामुळे सर्व कान्या-कोपर्यांपर्यंत KBC चा प्रचार होऊन पूर्वीपेक्षाही अनेक पटींनी जास्त मोठा प्रतिसाद मिळाला.यासाठी आपल्या बोदवड येथील एड. के एस इंगळे यांचे सुपुत्र भीमराव इंगळे यांनी प्रयत्न केला होता. यात ऑडीशन साठी त्यांची निवड करण्यात आली असून,6 जून20 रोजी सकाळी11 वाजता ते ऑनलाईन ऑडीशन देणार आहे. याआधी सुद्धा 2005 मध्ये केबीसी मध्ये त्यांची निवड झाली होती व अमिताभ बच्चन यांच्या सोबत त्यांनी सहभाग नोंदविला होता.आता 15 वर्षानंतर पुन्हा त्यांच्या हातून नवा इतिहास घडावा आणि तालुक्याच्या नावलौकिकात भर टाकावी ही माफक अपेक्षा…!भीमरावजी पुन्हा आपले त्रिवार अभिनंदन..!