बोदवडकरांसाठी दिलासादायक बातमी ! ‘त्या’ चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह

0

बोदवड – भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने बोदवड येथील चौघांना शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह (कोविड १९) सेंटरमध्ये क्वारंटाइन करण्यात होते.या चारही जणांचे अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला सहा दिवसानंतर प्राप्त झाले असून सुदैवाने या चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून दोन हात लांब असलेल्या कोरोनामुक्त बोदवड शहरातील हे चारही जण भुसावळ तालुक्यातील मोंढाळा येथील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते.त्यात शहरातील नाडगाव रोडवरिल खाजगी डॉक्टर,कंपाउंडर,लॅब असिस्टंट व तालुक्यातील मनूर येथील नातेवाईक अशा या चौघांना समावेश होता.गेल्या सहा दिवसांपासून या चारही जणांच्या तपासणी अहवालाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते.सुदैवाने या चारही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने ही बातमी संपुर्ण तालुकावासियांसाठी दिलासादायक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.