Wednesday, August 17, 2022

बोढरे शिवारात अपहरण झालेल्या बालकाचा खून

- Advertisement -

चाळीसगाव – चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील ऋषिकेश पंडित सोनवणे या आठ वर्षाच्या बालकाचा अपहरण करून ठार मारून त्याचे प्रेत एका गोणीत भरून मृतदेह बोढरे शिवारातील पेट्रोल पंपाच्या मागील शेताच्या नाल्याजवळ फेकून दिल्याचा प्रकार झाल्याने खळबळ उडाली.

- Advertisement -

चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील आठ वर्षीय बालक ऋषिकेश पंडित सोनवणे हा दिनांक 28 जून रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्याचे वडील पंडित सोनवणे यांच्याकडून दोन रुपये घेऊन चॉकलेट घेण्यासाठी जातो असे सांगून गेला होता त्यानंतर तो घरी वापस आलाच नाही म्हणून त्याच्या वडिलांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अज्ञात इसमावर काहीतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास लोंजे बीटचे हवलदार किशोर सोनवणे करीत होते. तपास सुरू असतानाच ग्रामीण पोलीस स्टेशनला कन्नड घाटाच्या पायथ्याशी बोढरे शिवारात पेट्रोल पंपाच्या मागील नाल्याजवळ एका गोणीमध्ये प्रेत असल्याची व त्यातून दुर्गंधी येत असल्याची खबर पोलिसांना मिळताच घटनास्थळी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप सिंग शिकारे, शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, हवालदार किशोर सोनवणे व त्यांच्या सहकार्‍यांनी लागलीच धाव घेतली घटनास्थळाचे निरीक्षण करून गोणीत असलेले बालकाचे प्रेत असल्याची ओळख पटल्यानंतर ते प्रेत बोढरे येथील अपहरण झालेले बालक ऋषिकेश पंडित सोनवणे याचेच असल्याची खात्री पटली. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ पंजाबराव उगले यांना दिल्यानंतर त्यांनी लागलीच चाळीसगावी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचे पाहणी केली त्यांच्यासोबत चाळीसगावचे डी वाय एस पी उत्तम कडलक होते.गोणी तील असलेले बालकाचे प्रेत डी कंपोजर झाले असल्याने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी पी बाविस्कर यांनी प्रेताचे जागेवरच शवविच्छेदन करून जागेवरच दफनविधी केला .या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून या बालकाचा खून करून गोणीत भरून ती गोणी नाल्यात फेकून दिली व संशय येऊ नये म्हणून गोणी वर दगड ठेवून दिल्याने आढळून आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हा प्रकार नरबळी तून झाला नाही ना? अशी चर्चा होत आहे. या घटनेप्रकरणी उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.

- Advertisement -

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या