चाळीसगाव :-चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील अपहरण झालेल्या आठ वर्ष बालकाचा 5 रोजी निर्घुण खून करण्यात आला होता. याप्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक श्री छोरींग दोरजे साहेब यांनी बोढरे गावाला भेट देत पोलिसांना या घटनेप्रकरणी तपास कामी मार्गदर्शन केले.
ऋषिकेश सोनवणे हा २८ जून रोजी बेपत्ता झाला होता. त्याचे वडील पंडित सोनवणे यांच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अपहरणाचा तपास सुरू असताना दिनांक ५ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास बोढरे शिवारात टाकलेल्या गोणपाटात कुजलेल्या अवस्थेत ऋषिकेश सोनवणे यांचा मृतदेह आढळून आला होता तेव्हापासून या घटनेचा तपास सुरू आहे पोलिसांच्या हाती काही धागेदोरे लागलेले नाहीत. दरम्यान तपासासाठी चाळीसगाव पोलिसांकडून पाच पथके राज्यातील विविध भागात रवाना करण्यात आली होती त्यांच्या हाती काही ठोस धागेदोरे लागले नाही .
“दोरजे साहेबांनी साधला ग्रामस्थांची संवाद
घटनेचे गांभीर्य पाहता नाशिक परिक्षेत्रातील पोलीस महानिरीक्षक छोरींग दोरजे यांनी शुक्रवारी दुपारी बोढरे गावाला व घटनास्थळाला भेट देऊन तेथील ग्रामस्थांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करत तपास कामी सहकार्य करण्याचे आव्हान केले.
याप्रसंगी त्यांच्यासोबत चाळीसगाव विभागाचे डीवायएसपी उत्तम कडलक, चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, आदी सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर दोरजे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्याला भेट देत तपासाची माहिती घेतली व जळगाव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले साहेब,यांच्याशी चर्चा केली.