बोढरे ग्रामपंचायतीच्या मनमानी भोंगळ कारभारविरोधात पंचायत समिती समोर धरणे आंदोलन

0

चाळीसगाव प्रतिनिधी – तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतीबाबत दोन वर्षापुर्वी लोकशाही दिनी दिलेल्या तक्रारीवर अद्याप कुठलेही निर्णय झाला नसून  मौजे बोढरे ग्रामपंचायतीच्या मनमानी भोंगळ कारभारविरोधात कुठलीच कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ आज सोमवार दि.17 रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन केले.

या निवेदनात म्हटले आहे की, मौज बोढरे येथील ग्रामपंचायतीच्या मनमानी, बेकायदेशीर व अधिकाराचा गैरवापर करून खाजगी सोलर प्रकल्पांना मौजे बोढरे ग्रामपंचायातीने ग्रामसभा न घेता सोलर पीडित शेतकऱ्यांना पूर्व सुचना न देता परस्पर अपुऱ्या मासिक सभेचा ठराव दिला.हा प्रकार व  गावाच्या इतर समस्यांबाबत भिमराव जाधव यांनी लोकशाही दिनी दि.19/7/2018 रोजी तक्रार केली होती.गावाचे सरपंच व इतर दोन ग्रामपंचायत सदस्यांनी उर्वरीत 7 ग्रामपंचायत सदस्यांना न कळविता परस्पर सोलर प्रकल्पास ठराव दिल्याने तो ठराव रद्दबातल व्हावा व संबंधीतांवर पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी कारवाई व्हावी तसेच गावाच्या इतर सुख सुविधेबाबात समस्या सोडविण्यास ग्रामपंचायत कार्यकारणी कर्तव्यात कसुर करीत कारवाई करावी अशा मागणींसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भिमराव जाधव, रघुनाथ राठोड, अप्पा जाधव, एकनाथ राठोड, सोमा चव्हाण, रामा राठोड, महादू राठोड, ओंकार राठोड, अलासिंग राठोड, छगन राठोड, पंडीत राठोड, हरदास राठोड,हिरा राठोड, वच्छीबाई राठोड, भाऊ चव्हाण, रामचंद्र चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व महिला सहभागी झाले होते.

पंचायत समितीने ठरवले बेकायदा आंदोलन

दरम्यान या आंदोलनाबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती चाळीसगाव यांनी पत्रक दिले असून त्यात संबंधीत तक्रारीबांबत सखोल चौकशी करण्यात येवून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जि.प. जळगाव यांच्याकडे  अहवाल पाठविण्यात आला आहे.काही मागण्या ह्या पंचायत समिती कार्यालयाशी संबंधीत नसल्याने ग्रामस्थांनी आंदोलनास बसू नसे. तरी देखील धरणे आंदोलन केल्यास ते नियमबाह्य ठरेल व त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही असे लेखी पत्र गटविकास अधिकारी यांनी आंदोलनकर्त्यांना दिले होते. मात्र ग्रामस्थ आपल्या आंदोलनावर ठाम राहीले व त्यांनी आंदोलन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.