चाळीसगाव (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत बोरखेडा येथील शेतकऱ्यांची फसवणूक संबधीत शेतकरी नगराज भाउराव पाटील,छायाबाई नगराज पाटील व एकनाथ नामदेव पाटील यांची फसवणुक करणारी कंपनी हायटेक कपंनीचे वाण,3201,3206 सुयोग कृषी केंद्र घाट रोड पंकज कृषी क्रेंद्र आडवा बाजार चाळीसगांव दुकानदारावर गुन्हे दाखल करा असे शेतकरी विचारमंचाचे जि.सरचिटणीस डॉ.डि.पी.पाटील ,भाजपा बलुतेदार आघाडीचे तालुकाध्यक्ष तुषार सुर्यवंशी ,प्रज्ञावंत आघाडीचे सरचिटणीस प्रा.प्रदिप पाटील,शेतकरी एकनाथ पाटील,राजेद्र पाटील यांनी तहसिलदार,पंचायत समिती सभापती,कृषी अधिकारीना यासंर्दभात लेखी स्वरुपात केलेली आहे.
शेतकऱ्यांनी या हंगामात एका दोघे कृषी क्रेदा मार्फत ज्वारीचे बियाणे खरेदी केले होते. मात्र या बियाण्यांची उगवण पुर्ण व्यवस्थीत झाली.पण कणसांना धान्याचा भरणाच न झाल्याने बोरखेड़ा येथील शेतकऱ्यांचे लाखोचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी राज्यपाल,मुख्यमंञी,कृषीमंञी,आदी वरीष्ठाना ,लेखी तक्रार केलेली आहे तसेच प्रत्यक्षर्शि कृषीअधिकारी ,तहसिलदार पंचायत समितीस सभापती यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन तहसिलदार यांनी संबंधित दुकानदार व कंपनीची चौकशी करून गुन्हा दाखल करावा,तसेच विभागाचे अधिकारी, शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेवून नुकसान भरपाई दयावी.
शेतकऱ्यांना गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच काही कंपन्या दुकानदार जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर कृषी विभागाच्या वतीने अशांवर कठोर कारवाई करावी.अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल.अस डॉ.डि.पी.पाटील यांनी सांगितले.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनीही काळजी घ्यावी. जळगाव जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रीबाबत सविस्तर माहिती कृषी आयुक्त यांनी घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा संबधीत शेतकर्यानी आत्मदहानाचा इशारा दिला आहे.यावेळी डॉ. डी.पी पाटील,तुषार सुर्यवंशी,प्रदीप पाटील,राजेंद्र पाटील,एकनाथ पाटील बोरखेड़ा येथील शेतकरी आदींसह उपस्थित होते.