खामगाव ( प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना पेरणी पासून तर आलेले उत्पादन विक्रीपर्यंत लुटल्या जाते त्याचे प्रत्येक्ष उदाहरणे अनेकवेळा समोर आले. त्याचा प्रत्येकांनी नेहमी बळी घेत राहावा म्हणून तर शेतकऱ्यांना बळी राजा म्हटले जात नाहीना ? असा प्रश्न बरेच वेळा पडतो. या आधी सुद्धा खामगाव तालुक्यात बोगस खते बनवणाऱ्या कंपनी वर छापा टाकून कृषी विभागाने कारवाई केली होती. आज पुन्हा खामगाव येथे गोपाळ नगर भागात नितीन सुर्वे नावाच्या व्यक्तीने प्रोसेसिंगची कुठलीही परवानगी न घेता खरीप हंगामाला लागणारे बियाणे पॅकिंग करणे सुरू असतांना समोर आले. कृषी विभागाने कारवाई सुध्दा केल्याचे सांगितले जात आहे.
यावर सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी सांगितले की शेतीला लागणारे बोगस उत्पादन करणाऱ्या कारखानदारांवर खरं तर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे वा शेतीला लागणारे बी बियाणे, खते, औषधे इत्यादी च्यावर किंमतीवर असे नियंत्रण आणावे की अश्या बोगस सामुग्री बनवायला परवडणारच नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या लुबाडणूक व फसवेगिरी ला आळा बसेल. परंतू असे करतांना आजपर्यंत कोणतेही शासन वा प्रशासन करतांना दिसले नाही. आतापर्यंत अनेक नामवंत कंपन्यांनी सुध्दा आपल्या आर्थिक फायद्यासाठी शेतकऱ्यांना बोगस बियाणे, खते, औषधे पुरविले त्यांच्या तक्रारी सुध्दा शेतकऱ्यांनी केल्या परंतू त्या कंपनी मालकांचे हात शासन व प्रशासनाच्या जवाबदार घटकापर्यंत पोहचलेले असतात. त्यामुळे हे जवाबदार व्यक्ती शेतकऱ्यांची एकी नसल्यामुळे त्या कारखानदारांना सहकार्य करून त्यांना अभय प्राप्त करून देतात.
शेतकऱ्यांचे खरीप पिक हे त्यांची वर्षभऱ्याची आमदणी असते ती गेली म्हणजे त्याच्या कुटुंबाचे पालनपोषण करणे कठीण होते व अशातून शेतकरी आत्महत्या होतात तसेच राष्ट्राच्या उत्पादनात सुध्दा घट झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पादनाची हानी होते त्यामुळे हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे.
या करिता शेतकऱ्यांनी आपली किंवा आपल्या शेतकरी बांधवांची फसवणूक झाली तर सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे असे सत्याग्रह शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय संयोजक कैलास फाटे यांनी म्हटले आहे.