बोगस बियांनामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान

0

वासोळ | प्रतिनिधी 

देवळा तालुक्यातील वडाळा येथील शेतकऱ्यांला बोगस कांदा बियांनामुळे पिकांसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च व उन्हाळ कांद्याचा हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यामध्ये त्रिव संतापाची लाट उसळली आहे.    वडाळा ता.देवळा येथील शेतकरी प्रदीप कारभारी सोनवणे यांनी फ्युजन सीडसचे १२ किलो बियाणे ३००० रुपये प्रति किलो प्रमाणे खरेदी केले .३ एकर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली असता उन्हाळ ऐवजी पांढरा कांदा ,जोड कांदा ,प्रजातीचे बियाणे निघाल्याने शेतकऱ्यांचे लाखों रूपयांचे नुकसान झाले आहे.
चालू वर्षी अतिवृष्टी व सततच्या ढगाळ वातावरणामुळे कांदा रोपे वाया गेल्याने दुबार पेरणी साठी बियाण्यांची तीव्र टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याच्या दरात बियाणे खरेदी करावे लागले होते अशा परिस्थितीत वडाळा येथील शेतकऱ्यांने तीन हजार रुपये प्रति किलो प्रमाणे बियाणे खरेदी केले संबंधितांनी बियाणे खरेदी केलेल्या बियाणांची रीतसर पावती देण्यासाठी टाळाटाळ केली ,शेकऱ्यांनी बी पेरणी केली  रोप उगवली ,त्यानुसार लागवड केली अवकाळी पाऊस रोगट हवामानांमुळे महागड्या औषदांची फवारणी करून पिकांना जतन केले दोन महिन्याचे संपूर्ण कांदा पिकाला डोगले निघाले असून शेतकऱ्यांला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे व परिसरातील नगदी हंगामच वाया गेल्याने शेतकऱ्यांने संबंधित बियाणे कंपनीकडे पिकांची पाहणी करण्यासाठी व फसवणूकी बाबत विचारणा केली  असता संबंधितांकडून उडवा उडवीचे उत्तर मिळत आहेत संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे.

एकून झालेला खर्च –

बियाणे –१२ कि.३००० रु की.प्रमाणे =३६००० रु

एकरी ५५०० रु खर्च

खाद्य – ४५००

औषधे- १५०० ते २००० एकरी

काढणी खर्च – ४००० एकरी

 

महागडे बियाणे खरेदी करून लागवड केली ,बदलत्या हवामानात पिकांची काळजी घेतली मात्र पीक वाढले तसतसे डोगले निघु लागल्याने कंपनीकडे विनवण्या करूनही उडवा उडवीची उत्तरे मिळताय.

-प्रदीप कारभारी सोनवणे शेतकरी

Leave A Reply

Your email address will not be published.