बोगस पटसंख्या दाखवून शासनाची फसवणूक

0

पाचोरा | प्रतिनिधी

नगरदेवळा ता. येथील सरदार एस. के. पवार विद्यालयातील उर्दू विभागात संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून बोगस पटसंख्या दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही व्हावी असे निवेदन शिक्षणाधिकारी जळगांव यांना देण्यात आले आहे.  सन – २०११ या वर्षी गावातील काही विद्यार्थी इयत्ता ६ वी मध्ये जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा ता. पाचोरा येथे शिक्षण घेत असतांना त्याच विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून सरदार एस. के. पवार विद्यालय उर्दू विभाग मध्ये बोगस पटसंख्या तात्कालीन संचालक मंडळ, तात्कालीन मुख्याध्यापक बी. एफ. निकुंभ, उर्दूचे मुख्याध्यापक रियाजद्दीन कादर, शिक्षक शेख खलील अब्दुल मजीद, शेख इकबाल अब्दुल मजीद यांनी संगनमताने विद्यार्थी संख्या दिसावी म्हणून तेच विद्यार्थी त्याच वर्षी पवार विद्यालयात देखील शिक्षण घेत असल्याचे दाखविले. तसेच बनावट कागदपत्रे तयार करून एकप्रकारे शासनाची फसवणूक केली आहे. त्यामुळे शिक्षणाबाबत गैरसमज निर्माण होऊन गावाची बदनामी करण्याचे गैरकृत्य व शिक्षण पेशाला न शोभणारे कृत्य वरील सर्वांनी केले आहे. त्यामुळे हे सर्व कटकारस्थान करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधितांवर सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही व्हावी व गुन्हा दाखल करण्याचे आदेश व्हावेत असे निवेदन संतोष जगन्नाथ महाजन नगरदेवळा यांनी शिक्षणाधिकारी जळगांव यांचेकडे दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here