आमदार चिमणराव पाटील यांची मागणी
एरंडोल – तालुक्यात परतीच्या पावसामुळे एरंडोल पारोळा भडगाव एरंडोल विधानसभा मतदार संघासह जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंड आळी व लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे व शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे . तरी याबाबत शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई त्वरित द्यावी अशी मागणी आमदार आमदार चिमणराव पाटील केली आहे.
यावर्षी नुकत्याच संपलेल्या पावसाळ्यात एरंडोल विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यात व जळगाव जिल्ह्यात शेतकरी शेतकरी चारही बाजूने संकटात सापडला आहे आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी अवस्था कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची झाली आहे परतीच्या पावसामुळे परतीच्या पावसामुळे तोंडाशी आलेला घास वाया गेला आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आला आहे तरी त्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने युद्ध पातळीवर नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे अन्यथा शेतकरी शेतकरी आत्महत्या घटना पुन्हा वाढू शकतात अशी भीती आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केली आहे