चाळीसगाव :- तालुक्यातील बेलदारवाडी येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास मागील भांडणांचा राग मनात धरून एकास चाकूने भोकसून ठार केले तर दुसर्या भावाच्या पोटात सुरा खुपसून जिवे मारण्याच्या प्रयत्न केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी येथील रहिवासी ज्ञानश्वेर सुभाष कुमावत,यास मागील भाडणांचा राग मनात धरून आरोपी बापू उर्फ पिंटू सिताराम कुमावत,छोटीबाई गोपीचंद कुमावत,किरणबाई राकेश कुमावत यांनी ज्ञानेश्वर कुमावत यांच्या छातीत वार केला ,चाकूचा वार वर्मी लागल्याने ज्ञानेश्वर जागीच ठार झाला,त्याचा ईश्वर सुभाष कुमावत हा ज्ञानेश्वर कुमावत यास वाचविण्यासाठी गेला असता आरोपी बापू कुमावत याने त्याच्याही पोटात सूरा खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला , त्यांच्यावर शहराच्या डॉ देवरे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत,
या घटनेबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला संतोष सुभाष कुमावत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १) बापू उर्फ पिंटू सिताराम कुमावत,२)छोटीबाई गोपीचंद कुमावत,३)किरणबाई राकेश कुमावत, सर्व रा. बेलदारवाडी यांचेवर गुन्हा रजिस्टर २३२/२०१९ ,चे भा.द.वी.३०२,३०७,५०४,१२० ब,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री प्रतापसिंग शिकरे करीत आहे,
खूप दुखत घटना घडली
निषेध