बेलदारवाडी ग्रा.पं.वर शिवसेनेचा भगवा ; नवनिर्वाचित सदस्यांचा तालुका प्रमुखांकडून सन्मान

0

चाळीसगाव:-(प्रतिनिधी) : चाळीसगाव तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून यापैकी बेलदारवाडी येथील नवनिर्वाचित सदस्य आज चाळीसगावातील शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश आबा चव्हाण यांच्या कार्यालयावर तालुका पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आले असता या सर्व सदस्यांना शिवसेनेचा भगवा व पुष्पहार घालून सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

याच वेळी ग्रामविकासासाठी शासन स्तरा पासून ते वैयक्तिक स्तरापर्यंत सर्व प्रकारची मदत केली जाईल असा शब्द यावेळी या सदस्यांना देण्यात आला नव निर्वाचित सदस्यांमध्ये ताराबाई अंबरनाथ कुमावत, कृष्णा सुखदेव कुमावत, काजल जगदिष कुमावत, पूजा सुनिल कुमावत, सुशीला राजेंद्र कुमावत, सविता सुरेश कुमावत, भारत लाला शेरे, प्रकाश रमेश कुमावत, यांचा समावेश आहे यावेळी शिवसेना तालुका प्रवक्ता  दिलीप घोरपडे  शिवसेना महीला आघाडी उप तालुका प्रमूख सौ.सविता कुमावत तालुका संघटक सुनील गायकवाड अण्णा पाटील सुनील कुडे चेतन कुमावत गणेश भवर आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here