बेपत्ता प्रौढाचा विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ

0

चाळीसगाव प्रतिनिधी । देवळी शिवारातील विहिरीत उंबरखेड येथील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळून आला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत मेहुणबारे पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

 

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,  तुकाराम धर्मा महाले (वय- ४६ रा. उंबरखेड) ता. चाळीसगाव आपल्या पत्नी व मुलांबरोबर येथे वास्तव्यास होता. तुकाराम महाले हा लहानपणापासून मनोरूग्ण होता. दरम्यान त्यांच्यावर उपचार सुरू होता. तो आपला मामा रमेश बागूल रा. वरखेडे यांच्या सलूनच्या दुकानात कामाला जात असे. दि. २ मार्च रोजी सकाळी ६:३० वाजताच्या सुमारास तुकाराम महाले हा कामासाठी वरखेडे येथे गेले असता घरी परतलाच नाही. शोधाशोध केली असता मिळून आला नाही. म्हणून चुलत भाऊ रोहित महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात हरवल्याची खबर ५ मार्च रोजी देण्यात आली होती.

दरम्यान तालुक्यातील उंबरखेड शिवारातील देवळी येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत ९ मार्च रोजी एका इसमाचे मृतदेह असल्याचे दिसून आले. परिसरात एकच खळबळ उडाली असून याच विहीरीतून गावाला पाणीपुरवठा होत असल्याने गावकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबाबत कुणाल महाले यांनी मेहूनबारे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.