बेकायदेशीर दारू विक्री; ५ हातगाड्या धारकांवर गुन्हा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील गुजराल पेट्रोल पंप, सिव्हील हॉस्पिटल परिसरात अंडापाव भुर्जी लोटगाडी धारक विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या पाच जणांवर कारवाई करत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंडापाव, चिकन फ्राय हातगाडीवर विनापरवाना दारू विक्री होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली. त्यानुसार शुक्रवार १७ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता शहरातील गुजराल पेटोल पंपाजवळील एनएन वाईन शॉप समोर अंडापाव, भुर्जी विकणाऱ्या संशयित आरोपी योगेश कैलास चौधरी रा. पिंप्राळा यांच्यावर कारवाई करत दारू हस्तगत केली.

तर दुसऱ्या कारवाईत जिल्हा रूग्णालयात जवळील बी.जे. मार्केट परिसरातील चिकन फ्राय हातगाडीवर दारू विकतांना तीन दुकानदार आढळून आले. यात मनोज शिवाजी पाटील, गोपाळ मधूकर चौधरी आणि प्रकाश भगवान चौधरी तिघे रा. कासमवाडी जळगाव यांच्यावर कारवाई करत तीन हातगाडी दुकान व दारू हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि महेंद्र वाघमारे, सपोनि देशमुख, पोहेकॉ मनोज पवार, महेंद्र पाटील,  तुषार जावरे, पोना संतोष सोनवणे, पोना गणेश पाटील,  योगेश साबळे, समाधान पाटील, विकास पहुरकर, विनोद पाटील, अमित मराठे, माधव कांबळे, जुबेर तडवी, यांनी सदर कारवाई केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.