नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
तुम्ही जर वोडाफोन आयडियाचे युजर्स असाल तर ही वाईट बातमी तुमच्यासाठी असून तुम्हाला झटका देणारी आहे. Vodafone Idea (Vi) ने भारतात आपला सर्वात स्वस्त प्लानला बंद केले आहे. कंपनीने भारतातील अनेक भागात ४९ रुपयांचा प्रीपेड प्लान बंद केला आहे. वोडाफोन आयडियाचा हा प्लान सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान होता. आता या प्रीपेड रिचार्ज प्लानला बंद केल्यानंतर ग्राहकांना आता कमीत कमी ७९ रुपयाचा रिचार्ज करावा लागणार आहे. आता ७९ रुपयाच्या प्लानमध्ये तुम्हाला कोण कोणती सुविधा मिळते, हे जाणून घ्या.
वोडाफोन आयडियाच्या ४९ रुपयाच्या प्लानमध्ये युजर्संना १४ दिवसासाठी ३८ रुपयाचा टॉकटाइम आणि १०० एमबी डेटा दिला जात होता. या प्लानसोबत कोणत्याही एसएमएसची सुविधा दिली जात नव्हती.
वोडाफोन आयडियाचा ७९ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये २०० एमबी डेटा, ६४ रुपयाचा टॉकटाइम आणि २८ दिवसाची वैधता मिळते. या प्लानसोबत कोणतीही एसएमएसची सुविधा दिली जात नाही. ४९ रुपयाच्या प्लानच्या तुलनेत ७९ रुपयाचा प्लान सोबत युजर्संना जवळपास दुप्पट लाभ मिळेल. ही योजना महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशसह निवडक दूरसंचार सर्कलमध्ये दिली जाते. हे कंपनीकडून इनडायरेक्ट रुपाने केली जात असलेली वाढ आहे. युजर्संना जास्त फायदा मिळतो, परंतु, आता त्यांना जास्त खर्च करावा लागणार आहे.