बुलढाणा जिल्ह्यात लॉकडाऊनला प्रतिसाद

0

खामगाव (प्रतिनिधी) : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या विकेंड लॉकडाऊनला नागरिक व व्यापार्‍यांनी खामगाव शहरासह जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. त्यामुळे रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत होता.

शनिवार आणि रविवार या दोन दिवसांच्या लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी जिल्हाभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही बंद आहेत. तर  किराणा माल, भाजीमार्केट, हॉटेल्सनाही टाळे लागले आहे. तर वाहतुकीवरही परिणाम दिसून आला. महत्वाचे म्हणजे अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी असली तरी पेट्रोल पंप ,  मेडिकल आणि दुधाची दुकाने वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत. अगदी साधी टपरीदेखील उघडी नाही. राज्यात कोरोनाचा सामना करण्यासाठी सरकाने कडक निर्बंध लावताना शनिवार आणि रविवारी कडक लॉकडावून घोषित केला . या दोन दिवसात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील असे जाहीर करण्यात आले.  राज्यात अनेक ठिकाणी लॉकडावूनला विरोध होत असताना जिल्हावासियांनी विकेंड लॉकडाऊन मात्र मनापासून स्वीकारलेला दिसत आहे.

जिल्ह्यात शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही. जिवनाश्यक वस्तु वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने बंद आहेत की सुरू, याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती स्वत: 9 एप्रिल रोजी  बुलडाणा शहरात रस्त्यावर उतरले. निर्बंधांचे आदेश मोडणार्‍या काही दुकानदारांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली व त्यांना नियमानुसार दंड ठोठावला. कारवाई करताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गापासून स्वत:चे व कुटूंबियांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंग नियम पाळावा व हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले.

845 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू

काल 9 एप्रिल रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत  प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात मागील 24 तासात 845 कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे 302 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना पाझिटिव्ह रूग्णांमध्ये बुलडाणा 265, खामगांव 82, शेगांव 31, दे.ऊळगावराजा 59, चिखली 64, मेहकर , 88, मलकापूर 73, नांदुरा 37, लोणार  58, मोताळा 29, जळगांव जामोद 31, सिंदखेडराजा 26 आणि संग्रामपूर 2 अशा 845 रूग्णांचा समावेश आहे

Leave A Reply

Your email address will not be published.