बुलडाणा (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून आज 837 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 3575 अहवाल प्राप्त झाले आहेत.
यापैकी 2669 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 837 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. यामध्ये बुलडाणा 127, खामगाव 57, शेगाव 90, दे.राजा 54, चिखली 83, संग्रामपूर 92, मेहकर 29, मलकापूर 36, नांदुरा 61, मोताळा 61, जळगाव जा.77, सिं.राजा 47, लोणार 9, लाखनवाडा 2, सिद्धीविनायक हॉस्पीटल 7, सहयोग हॉस्पीटल 2, आशिर्वाद हॉस्पीटल 3 असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज अखेर एकूण 20925 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 18097 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 2630 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 198 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती मिळाली आहे.