बुलढाणा जिल्ह्यातील दारु दुकानांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ,

0

खामगांव  :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात दारु दुकानांसमोरील गर्दी टाळण्याकरीता शासनाने दारु विक्रीवर ‘बंदी’ घातली आहे. दारुबंदी अधिकाऱ्यांनी दारु दुकानातील मालसाठा किती आहे याची तपासणी करुन त्याची नोंद घेऊन प्रत्येक दुकानाला समोरुन सिल लावलेले आहेत. अनेक दुकानांचे मागील दरवाज्याचे सिल न लावता ‘रामभरोसे’ सोडल्याची आणि मालसाठ्याच्या नोंदमध्ये अफरातफर असल्याची शंका अनेक नागरीक बोलुन दाखवित आहेत.

लॉकडाऊन काळात जिल्ह्यात अनेक दारु दुकानांमध्ये चोरी झाल्याच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेल्या आहेत. चोरी झालेल्या मालाची विंâमत एवढी आहे की तो माल चारचाकी वाहनाशिवाय चोरुन नेता येत नाही. मग लॉकडाऊन काळात हे शक्य आहे काय? असा सवाल नागरीक करीत आहेत. दुकानातील दारुसाठा दुप्पट दराने अवैध मार्गाने विकुन संपलेला साठा हा चोरी गेल्याची ‘खोटी तक्रार’ दिल्या जाऊ शकते. आणि विमा असल्यास विमा वंâपनीकडून चोरी गेलेल्या मालाची विंâमतही वसुल होऊ शकते.

अशाप्रकारे अनेक दुकानदारांनी शक्कल लढविल्याची सर्वत्र चर्चा होत असुन हे सर्व दारु बंदी (राज्य उत्पादन शुल्क) अधिकाNयांच्या आशिर्वादाने शक्य होत असल्याचे सुज्ञ नागरीक बोलत आहेत.या मोठ्या घबाडाची उच्चस्तरीय चौकशी होणे गरजेचे आहे अशी मागणी होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.