बुलढाणा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टच्या वतीने कोरोना चाचणी शिबिर

0

खामगाव(गणेश भेरडे) – बुलढाणा केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने राज्य सचिव अनिलभाऊ नावंदर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. बाबासाहेब फैजपूरकर सभागृह केमिस्ट भवन नटराज गार्डनसमोर येथे कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून केमिस्ट व व्यापारी बांधवासह जनतेने शिबिराचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र नहार यांनी केले आहे.

आज 26 मार्च रोजी सुमारे 150 जणांची रॅपिड कोरोना चाचणी करण्यात आली. तर उद्या 27 मार्च रोजी दुपारी 2 वाजेपासून नाव नोंदणी करण्यात येणार असून दुपारी 3 वाजेपासून तपासणी करण्यात येणार आहे. सध्या शहरात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून भविष्यातील धोका टाळण्यासाठी तसेच कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. तेव्हा नागरिकांनी स्वत पुढकार घेऊन कोरोना चाचणी करून घ्यावी, असेही राजेंद्र नहार यांनी सांगितले. सदर शिबिरासाठी डॉ.  संजय चहाण,डाॅ. अमोल अडाव, डाॅ.अतिमा गवई,गजानन निमकर्डे,जावेद खान व  संघटनेचे जगदिश नावदंर, धर्मश शहा, अजय जैन नंदकिशोर कांडेकर ,गणेश चांडक ,सुरेश थारकर,ओम राठी,शितल नहार,यांचे सहकार्य लाभत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.