बुलडाणा – स्थानिक गुन्हे शाखेचे गोपनीय माहितीच्या आधारावर बुलडाण्यातील बालाजीनगर परीसरात छापा मारुन तब्बल 27 क्किटल गांजा जप्त केला आहे बाजार भावानुसार एक कोटी रुपयांच्या घरात या गांजाची कीमत असुन प्रकरणी एका वाहनासह दोन जणाना ताब्यात घेण्यात आले बुलडाणा जिल्हातील कुर्हा – गोतमारा येथील मनोज झुलालसिंग झाडे व गजानन सुज्ञान मंजा या दोघाना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.यासोबत एक चार चाकी वाहनही जप्त करण्यात आले असुन या वाहनातही गांजा ठेवण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक महेन्द देशमुख यानी लोकमतशी बोलताना सांगितले. की कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षकमहेन्द देशमुख,पोलीस अधिकारी पाडुरंग इगंळे. इम्रान इनामदार,मुकुंद देशमुख,गाजानन काळे,गिता बामणदे,सीनिल खरात,संजय नागवे,अत्ताऊल्ला खान याच्यासह जवळपास 17 पोलीस अधिकारी ,कर्मचार्यानी या कारवाईत भाग घेतला . एनडीपीस कायद्यानुसार (1985) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.