बुलडाणा : जिल्ह्यात शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही. जिवनाश्वयक वस्तु वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने बंद आहेत की सुरू याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती स्वत: आज बुलडाणा शहरात रस्त्यावर उतरले. निर्बंधांचे आदेश मोडणाऱ्या काही दुकानांवर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली व त्यांना नियमानुसार दंड ठोठाविला.
कारवाई करताना जिल्हाधिकारी यांनी कोरोना संसर्गापासून स्वत:चे व कुटूंबियांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टसिंग नियम पाळावा व हात वारंवार धुवावे किंवा सॅनीटाईज करावे. तसेच शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.