बीएसएनएल ची सेवा सुरळीत करावी अन्यथा तीव्र आंदोलन !

0

निपाणे- एरंडोल तालुक्यातील येथे किशोर बियाणी यांच्या मालकीच्या जमिनीवर भारतीय दूर संसार निगम लिमिटेड कंपनीचे टॉवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे अनेक ग्राहकाकडे इतर मोबाईलच्या  कंपन्यांकडे पाठ फिरवत बीएसएनएल कार्डला पसंती देऊन ग्राहक झाले. 

मात्र  गेल्या सहा महीण्यापासून वीज गेल्यावर पूर्णता रेंज हि गुल होते. हे प्रकार सतत  घडत असल्याने ग्राहक मात्र हैराण होत आहेत. मनोरा ज्या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्या ठिकाणी उभा आहे तेथेसुध्दा जनरेटर देखील आहे मात्र कर्मचारी नसल्याने जनरेटचा वापर केला जात  नाही ग्राहकांना हैराण व्हावे लागत आहे बॅटऱ्या पूर्णपणे निकाम्या झाल्या आहे वीज गेल्यावर त्वरित उतरतात फोन मोबाईल सेवा बंद पडते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन नव्या बॅटऱ्या निपाणे येथे बसवाव्यात बीएसएनएल ची सेवा सुरळीत करावी अशी मागणी त्रस्त झालेले  ग्रामस्थानी केली आहे नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला असे.   

Leave A Reply

Your email address will not be published.