पुणे लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वात जास्त चर्चेत असलेले बीएचआर पतसंस्था घोटाळ्या प्रकरणी अखेर अनेक दिवसांपासून फरार असलेले संशयित आरोपी भाजपचे विधानपरिषदेचे आमदार चंदूलाल पटेल यांचा आज न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
या घोटाळ्या प्रकरणात पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अनेकांना गजाआड केले. तसेच नवनवीन माहिती उजेडात येत असल्यामुळे याप्रकरणी चर्चा रंगली आहे. दरम्यान, गेल्या एक दीड महिन्यापासून आमदार चंदूलाल पटेल हे पोलिसांना सापडत नव्हते. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाला आहे आहे. मात्र पुणे न्यायालयाने त्यांना आज अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. तसेच याप्रकरणी अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे.