Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    • अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट!
    • अपहरणाचा संशय : विमानाचे आपत्कालीन लँडिंग
    • पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन
    • ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी भारत एक मोठी बाजारपेठ
    • दुष्काळी मदतीसह आणखी तीन मोठे निर्णय!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»बीएचआर प्रकरणात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ; खडसे
    जळगाव

    बीएचआर प्रकरणात जे-जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ; खडसे

    By June 17, 2021No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी : बीएचआर घोटाळा प्रकरणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सकाळी एकाचवेळी ठिकठिकाणी टाकलेल्या छापेमारीने मोठी खळबळ उडाली आहे. यात बड्या व्यावसायिकांसह राजकीय व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, आमदार असो की खासदार कारवाईतर होणारच अशा शब्दात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी इशारा दिला आहे.

    बीएचआर घोटाळ्यात आज झालेल्या अटकेच्या कारवाईचे स्वागतच केले पाहिजे. कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही. आमदार असो वा कुणी अन्य असो कायद्यासमोर सगळेच सारखे आहे. या प्रकरणात प्राथमिक स्वरुपात कर्जदारांनी ठेवींच्या पावत्या २० टक्के, ३० टक्के दराने तोडून भरणा केलेला दिसतो. त्यामुळेच हि कारवाई झालेली आहे. या प्रकरणाची अद्याप चौकशी सुरु असून जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असेही खडसे म्हणाले आहे. दरम्यान, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात आज आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.

    अटक केलेल्या संशयितांची नावे अशी

    भागवत भंगाळे (जळगाव), छगन झाल्टे (जामनेर), जितेंद्र रमेश पाटील (औरंगाबाद येथून अटक), आसिफ मुन्ना तेली (भुसावळ), जयश्री शैलेश मणियार (जळगाव), संजय तोतला (जळगाव), राजेश लोढा (जामनेर), प्रितेश चंपालाल जैन (धुळे), अंबादास आबाजी मानकापे (औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (मुंबई), प्रेम नारायण कोगटा (जळगाव, यांना पुण्यातील हॉटेलातून अटक) आणि प्रमोद किसनराव कापसे (अकोला) यांना अटक करण्यात आली आहे.

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email

    Related Posts

    मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ

    October 14, 2026

    गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख

    October 14, 2026

    पाळधीत नवरात्रोत्सवानिमित्त श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन

    October 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif